Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज 'या' ठिकाणी 3 सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष या निवडणुकींच्या तयारीला लागले असून अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये तीन सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
दुपारी चिपळूण आणि रत्नागिरी येथे दोन सभा तर सिंधुदुर्गात तिसरी सभा पार पडणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे.
Summary
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये तीन सभा
दुपारी चिपळूण आणि रत्नागिरी येथे दोन सभा तर सिंधुदुर्गात तिसरी सभा
जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांचा कोकणात प्रचाराचा धडाका
