Kishori Pednekar
Kishori Pednekar

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kishori Pednekar)शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता किशोरी पेडणेकरांच्या या गटनेतेपदावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे.

दोनदा महापौरपद भूषवलेल्या पेडणेकरांना पुन्हा संधी दिल्याने नाराजी असल्याची माहिती मिळत असून कोरोनाकाळात पेडणेकर यांच्यावर आरोप झाले तरीही त्यांना जबाबदारी देण्यात आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे.

यासोबतच अनेक ज्येष्ठ नगरसेवक असताना देखील किशोरी पेडणेकर यांना संधी देण्यात आल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी पसरल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी

  • दोनदा महापौरपद भूषवलेल्या पेडणेकरांना पुन्हा संधी दिल्याने नाराजी

  • अनेक ज्येष्ठ नगरसेवक असताना पेडणेकर यांना संधी दिल्याने नाराजी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com