NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत या आठवड्यात चर्चेची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत या आठवड्यात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या आठवड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्फे विलीनीकरणाबाबत पक्षांतर्गत चर्चा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत असून उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विलिनीकरणावर चर्चेची शक्यता आहे. सुनेत्रा पवार पक्षातील आमदार, मंत्र्यांची विलिनीकरणाबाबत मतं जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत या आठवड्यात चर्चेची शक्यता
राष्ट्रवादीतर्फे पक्षांतर्गत चर्चेची शक्यता
सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार
