Earthquake
महाराष्ट्र
Earthquake : गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Earthquake) गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, कोरची आणि सिरोंचासह अनेक भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी नोंदविली गेली आहे.
तेलंगणातील मंचेरियलजवळ भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये कोणतेही नुकसान नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Summary
गडचिरोलीत भूकंपाचे धक्के
रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी जाणवले धक्के
तेलंगणातील मंचेरियलजवळ भूकंपाचे केंद्र
