Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : जिल्हा परिषद निवडणुकीचा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांचा धडाका

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Eknath Shinde) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

सर्वच राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी साडेतीन वाजता हमिदवाडा येथील सदाशिवनगर येथे पहिली सभा घेणार आहेत.

सायंकाळी सव्वापाच वाजता हातकणंगले तालुक्यातील रेंडाळ येथे रोड शो होणार असून सायंकाळी सहा वाजता हेरले येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर तारदाळ येथे जाहीर सभा होणार असून त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता आळते येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

Summary

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापूरात सभा

  • जि. प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका

  • विविध ठिकाणी चार सभा होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com