Election : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या निवडणूक; कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती सदस्यासाठी उद्या 7 फेब्रुवारीला निवडणूक असणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.
या 12 जिल्हा परिषदमध्ये यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे.
मतदानासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Summary
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती सदस्यासाठी उद्या निवडणूक
जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार
