Solapur
Solapur

Solapur : मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ; काही लोक EVM मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Solapur) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. उद्या सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. काल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडलं. यासोबतच उद्या 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

यातच आता मोहोळ मध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य येथे ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याची माहिती मिळत असून त्या अतिरिक्त असलेल्या मशीन असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

Summary

  • सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ

  • काही लोक EVM मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप

  • तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com