Solapur : मोहोळमध्ये धाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याचं प्रकरण; वाहन चालकावर गुन्हा दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Solapur) मोहोळ मध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य येथे ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याची माहिती मिळत असून त्या अतिरिक्त असलेल्या मशीन असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर आता परवानगी शिवाय ईव्हीएम असलेले वाहन स्ट्राँग रूम बाहेर नेल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असूनही परस्पर स्ट्राँगरूम मधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Summary
सोलापुरात EVM मशीन धाब्यावर आढळल्याचे प्रकरण
वाहन चालकावर गुन्हा दाखल
परवानगी शिवाय वाहन बाहेर नेल्याने गुन्हा
