Jalna
Jalna

Jalna : जालन्यातील बनावट नोटांची खरेदी-विक्री प्रकरण; 5 जणांना अटक, अंबड पोलिसांची मोठी कारवाई

जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Jalna ) जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 1 लाख 22 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अंबड परिसरात काही इसम भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटांची खरेदी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

यावेळी त्यांच्या ताब्यातून 500 रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा सापडल्या. या प्रकरणात आता 5 जणांना अटक करण्यात आली असून अंबड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Summary

  • जालन्यातील बनावट नोटांची खरेदी-विक्री प्रकरण

  • बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  • 5 जणांना अटक,अंबड पोलिसांची मोठी कारवाई

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com