Farmers
Farmers

Farmers : येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कांद्याला कवडीमोल भाव, शेतकरी संतप्त

येवल्यात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Farmers) येवल्यात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे इंदोर महामार्गावर सुमारे एक तासापासून रस्ता रोखून धरल्याचे पाहायला मिळत आहे.

येवल्यात कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी रोखले असून कांदा पिकासह शेतीमालाच्या दिवसेंदिवस भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात येत असून तहसीलदार जोपर्यंत घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याचे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Summary

  • येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  • कांद्याला कवडीमोल भाव, शेतकरी संतप्त

  • संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-इंदोर महामार्ग रोखला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com