Beed : बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी; घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Beed) बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याची माहिती मिळत आहे.
बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून बीड शहरातील एमआयडीसी भागात राहणाऱ्या या दोन कुटुंबात क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
याचेच रूपांतर हाणामारीमध्ये झाले त्यातून हे दोन्ही गट आपापसात भिडले. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.
Summary
बीडमध्ये दोन कुटुंबामध्ये हाणामारी
हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
हाणामारीत महिला जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
