Fire Case | खारमधील नूतन व्हिला इमारतीला आग

Fire Case | खारमधील नूतन व्हिला इमारतीला आग

Published by :
Published on

मुंबईतील खार पश्चिमेकडील गुरु गंगेश्वर मार्गावरील नुतन व्हिला बिल्डिंगमधील खोली क्रमांक २२९ मध्ये गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. येथील आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या. शिवाय १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका, पोलीस, महापालिकेचा विभागीय कर्मचारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी दाखल झाले.

येथील घरात लागलेली आग रात्री ऊशिरापर्यंत शमविण्याचे काम सुरु होते. मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत नसल्याने आणि आग भडकत असल्याने मदतीसाठी आणखी मनुष्यबळ धाडण्यात आले. त्यानुसार, घटनास्थळी आठ फायर इंजिन, सहा जेटी आणि आणखी अग्निशमन दलाचा फौजफाटा दाखल झाला होता, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com