Cabinet meeting : अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Cabinet meeting) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
राज्य सरकारने अजितदादांना श्रद्धांजली म्हणून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
Summary
अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित
दुपारी 12 वाजता होणार बैठक
