Pandharpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pandharpur) आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहाटेपासून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.
यासोबतच मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, ऑर्किड, ब्लू डेजी, कामिनी अशा दोन टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाई व फुलांची सजावट बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Summary
आज 77वा प्रजासत्ताक दिन
देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
