Subhash Zhambad : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना जामीन; 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Subhash Zhambad ) काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
झांबड व संचालकांवर २१ कोटींच्या बोगस ठेवी तारण दाखवून अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश डी. पाटील यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. या दुसऱ्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळाला आहे.
Summary
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना जामीन
1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन
बोगस ठेवी तारण दाखवून 21 कोटी रूपयांचा अपहार
