Nashik Tapovan : नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik Tapovan ) नाशिकच्या तपोवन येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारताना होणाऱ्या सुमारे १८०० झाडांच्या कथित वृक्षतोडीविरोधात आज सुनावणी पार पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
असून मनसे नेते नितीन पंडित यांनी वृक्ष तोडण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाने मागच्या सुनावणीत आदेश दिले होते. आजच्या या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
नाशिकच्या तपोवन येथील झाड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
मनसे नेते नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका
सुनावणीत काय निर्णय होणार ?
