Asim Sarode
Asim Sarode

Asim Sarode : शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता कमी; अ‍ॅड. असीम सरोदे यांची ट्वीट करत माहिती

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Asim Sarode) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता.

त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज आणि उद्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी घेण्यात येणार असून दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद आज आणि उद्या ऐकून घेण्यात येणार आहेत. अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते

'तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच). परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही. असे असीम सरोदे म्हणाले.

Summary

  • शिवसेना पक्ष चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता कमी

  • अ‍ॅड. असिम सरोदे यांची ट्वीट करत माहिती

  • सकाळी 11.30 वा. सुनावणी सुरू झाली तरच शक्य

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com