Vikas Gogawale : विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे हायकोर्टाकडून आदेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Vikas Gogawale ) महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना मतदान केंद्रबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला होता.
या प्रकरणात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल असून त्यात विकास गोगावले यांचाही समावेश आहे. विकास गोगावले तेव्हापासून फरार आहेत. आता विकास गोगावले फरार आहेत. अद्याप त्यांना पकडण्यात आलं नाही. याच पार्श्वभूमीवर आता 'पोलिसांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण या' असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावले यांना दिल्याची माहिती मिळत आहे.
रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झाला होता. त्याप्रकरणी कोर्टानं विकास गोगावलेंना शरण यायचे आदेश दिलेत. यातच 'मंत्री भरत गोगावले मुलाशी संपर्क साधून शरण येण्यास सांगतील'अशी माहिती महाधिवक्ता यांनी हायकोर्टात दिली. विकास गोगावले कोणत्या पोलीस ठाण्यात समर्पण करणार याकडे लक्ष लागले आहे.
Summary
महाड पालिका निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरण
विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश
सकाळी 11 पर्यंत शरण येण्याचे हायकोर्टाकडून आदेश
