Rohit Pawar : अजित दादांचा अपघात कसा झाला? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम
Rohit Pawar On Ajit Pawar Death : अजित दादांच्या विमान अपघाताबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेचा क्रम मांडला आणि काही गंभीर शंका व्यक्त केल्या.
रोहित पवार यांनी सांगितले की, मुंबईहून बारामतीकडे निघालेलं खासगी विमान नियोजित वेळेत उड्डाणासाठी तयार होतं. हवामान आणि दृश्यमानता तपासल्यानंतर विमानाने प्रवास सुरू केला. सुरुवातीचा प्रवास सुरळीत होता, मात्र बारामतीजवळ पोहोचल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. आधी जखमी असल्याची माहिती आली आणि थोड्याच वेळात निधनाची बातमी समोर आली, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
ते पुढे म्हणाले की, अपघातग्रस्त विमान साधारण 16 वर्ष जुने होते. कंपनीने विमान सुस्थितीत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षदर्शींनी विमानाचा आवाज वेगळा असल्याचं सांगितलं. यामुळे तांत्रिक बिघाडाचा संशय बळावतो आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही विमान अचानक झुकून कोसळल्याचं दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली.
थोडक्यात
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घटना क्रम मांडला.
विमान मुंबईहून बारामतीकडे नियोजित वेळेत उड्डाणासाठी तयार
हवामान आणि दृश्यमानता तपासल्यानंतर प्रवास सुरू झाला.
सुरुवातीचा प्रवास सुरळीत होता.
बारामतीजवळ पोहोचल्यानंतर काही मिनिटांत अपघात
आधी जखमी असल्याची माहिती, नंतर निधनाची बातमी.

