HSC Exam 2026
HSC EXAM 2026 | COPY-FREE EXAMS, DRONE SURVEILLANCE & STRICT ADMINISTRATION ACTION

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; कॉपी पकडल्यास थेट जेल, केंद्रांवर ड्रोनची नजर

Copy Free Exams: बारावीच्या HSC २०२६ परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आहे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन, सीसीटीव्ही आणि विशेष भरारी पथके तैनात; कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पारदर्शक आणि भयमुक्त परीक्षा सुनिश्चित केली जाणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

इयत्ता बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक शिक्षण विभागाने बहुआयामी व कठोर उपाययोजना राबवल्या आहेत. यासाठी परीक्षा केंद्र संचालक, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, भरारी व बैठे पथक यांची ऑनलाइन आढावा बैठक माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रशासनाने शून्य सहनशीलता धोरण जाहीर करून महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रवृत्ती कायदा १९८२ आणि मंडळाच्या सूचनांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांसह मदत करणारे, दुर्लक्ष करणारे किंवा डोळेझाक करणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही समान कारवाई होईल.

परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार, कॉपी किंवा मालप्रॅक्टिसेस खपवून घेतल्या जाणार नाहीत. नव्या टोकन पद्धतीने भरारी पथक विद्यार्थ्यांची तपासणी करेल. अनुक्रमांक १ ते ५०, ५१ ते १०० अशा गटांनुसार दालननिहाय कसून तपासणी. गैरप्रकार आढळल्यास त्या दालनातील परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व बैठे पथकावर थेट कारवाई, तर बैठे पथक असतानाही प्रकार झाल्यास पथकावरही शिक्षा.

परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ अंतर्गत अनधिकृत जमाव, संशयास्पद हालचाली किंवा दबावतंत्र सहन केले जाणार नाही. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष व वॉर रूम कार्यान्वित राहील. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरे, विशेष भरारी व नियमित बैठे पथके तैनात. २६ जानेवारीला दोन लाख विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्तीची शपथ घेतली असून, सर्वांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी, असे लाठकर यांनी आवाहन केले.

दक्षता समिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अध्यक्षतेखाली सज्ज असून, झेडपी सीईओ अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, एसपी डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाने लॉटरी पद्धतीने अचानक तपासण्या होतील. परीक्षा काळात झेरॉक्स सेंटर्स बंद, पालकांसाठी पंडाल, विद्यार्थ्यांसाठी पाणी-वीज-पंखे सुविधा केंद्र संचालकांच्या जबाबदारीत.

दक्षता समिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अध्यक्षतेखाली सज्ज असून, झेडपी सीईओ अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, एसपी डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाने लॉटरी पद्धतीने अचानक तपासण्या होतील. परीक्षा काळात झेरॉक्स सेंटर्स बंद, पालकांसाठी पंडाल, विद्यार्थ्यांसाठी पाणी-वीज-पंखे सुविधा केंद्र संचालकांच्या जबाबदारीत

Summary
  • जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक शिक्षण विभागाने बारावी परीक्षा २०२६ साठी कडक उपाययोजना राबवल्या

  • संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरे, विशेष भरारी पथके आणि ऑनलाइन निरीक्षण

  • कॉपी किंवा मालप्रॅक्टिसेस करणाऱ्यांवर थेट कडक कारवाई; अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी

  • परीक्षा काळात सीसीटीव्ही, लॉटरी पद्धतीने अचानक तपासण्या आणि सर्व सुविधा केंद्र संचालकांच्या जबाबदारीत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com