Ajit Pawar Funeral : लाडक्या अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत मोठी गर्दी
(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. अजिदादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
