Train Timetable
INDIAN RAILWAYS REVISES TIMETABLE FOR 12 TRAINS, NEW SCHEDULE FROM 30 JANUARY 2026

Train Timetable: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने १२ ट्रेनांच्या वेळापत्रकात केला बदल; ३० जानेवारीपासून नवे वेळापत्रक लागू

Indian Railways: भारतीय रेल्वेने १२ प्रमुख ट्रेनच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ३० जानेवारी २०२६ पासून नवीन वेळ लागू होईल.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बामती वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पुढील काही दिवसांत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने १२ ट्रेनांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या सोयी आणि ऑपरेशनल सुधारणांसाठी हा बदल करण्यात आला असून, रूळ दुरुस्ती आणि वेळेवर नियंत्रण यासाठीही हे आवश्यक होते. नवीन वेळापत्रक ३० जानेवारी २०२६ पासून लागू होईल, तर काही ट्रेनांच्या बाबतीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल होतील. प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून तपास घ्या, अन्यथा स्थानकावर ताटकळावा लागू शकतो.

Train Timetable
Nipah Virus: पश्चिम बंगालमध्ये निपाहचे दोन रुग्ण; मेंदूला सूज देणारा आणि प्राणघातक आजार भारतात प्रवेश

या बदललेल्या ट्रेनमध्ये तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. उदाहरणार्थ, ५४०२० रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन पॅसेंजरचे वेळापत्रक ३० जानेवारीपासून बदलते. ८२५०२ लखनौ जंक्शन-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून, २२४४९ गुवाहाटी-नवी दिल्ली एक्सप्रेस ३१ जानेवारीपासून नव्या वेळेनुसार धावेल.

सिलचर-नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि १२३४९ गोड्डा-नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेस २ फेब्रुवारीपासून, तर १४६१९ आगरतळा-फिरोजपूर कॅन्ट त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस ५ फेब्रुवारीपासून बदललेल्या वेळेनुसार चालेल. इतर ट्रेनांमध्ये २२४२७ बलिया-आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि १२५८३ लखनौ जंक्शन-आनंद विहार डबल डेकर एक्सप्रेसचे वेळापत्रक १ फेब्रुवारीपासून बदलले आहे.

Train Timetable
ATM Cash Withdrawal: सरकारचा मोठा निर्णय! लवकरच ATM मधून १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा मिळणार

१५५५७ दरभंगा जंक्शन-आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेस २ फेब्रुवारीपासून आणि ५४३२९ बालामऊ जंक्शन-शाहजहानपूर जंक्शन पॅसेंजर ३० जानेवारीपासून नव्या वेळेनुसार धावेल. ५४०७५ बरेली जंक्शन-दिल्ली जंक्शन पॅसेंजर ३० जानेवारीपासून आणि १३०२० काठगोदाम-हावडा जंक्शन बाग एक्सप्रेसमध्ये तात्काळ बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे बदल ट्रेन ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहेत. प्रवाशांना टिकट बुकिंग करताना किंवा स्थानकावर पोहोचताना नवीन वेळ तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Train Timetable
Supreme Court News: UGC च्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; अंमलबजावणीला स्थगिती, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Summary
  • भारतीय रेल्वेने १२ ट्रेनच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला.

  • नवीन वेळापत्रक ३० जानेवारी २०२६ पासून लागू होईल.

  • तेजस, हमसफर, अमृत भारत आणि इतर ट्रेनांचा समावेश.

  • प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत अॅप किंवा संकेतस्थळावर वेळ तपासण्याचे आवाहन.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com