MNS Meeting : राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची महत्त्वाची बैठक; काय चर्चा होणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MNS Meeting) आज मनेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक पार पडणार असून पराभवाच चिंतन करण्याकरता मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
MIG येथे सकाळी 9 वाजता ही बैठक होणार असून बुधवारी ही बैठक होणार होती मात्र अजित पवारांच्या निधनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज ही बैठक होणार आहे.
मुंबईतील 52 निवडणुकीचे उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक
MIG येथे सकाळी 9 वाजता होणार बैठक
मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत राहणार
