Mumbai : KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम; एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत गैरहजर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai ) आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार होते. BMC च्या KEM रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या औचित्याने हे एकत्र येणार होते.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे तर भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार होते.
शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता या KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळत असून मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.
Summary
KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिन
कार्यक्रमला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत अनुपस्थित
मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात
