Indapur : इंदापूरमध्ये 21 वर्षीय तरुणीचे अपहरण प्रकरण; भिगवण शहरात कडकडीत बंदची हाक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Indapur) इंदापूर तालुक्यात 17 फेब्रुवारीला 21 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भिगवण परिसरातील आयान शेख आणि हारुन शेख या युवकांनी मुलीचे अपहरण केल्याने भिगवण परिसरातील हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाले.
या प्रकरणी आता भिगवन परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे- सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार निदर्शने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. अपहरण करणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी आता करण्यात येत असून नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भिगवण शहरात कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासून संपूर्ण भिगवण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून संपूर्ण परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Summary
इंदापूरमध्ये 21 वर्षीय तरुणीचे अपहरण प्रकरण
संपूर्ण भिगवण शहर कडकडीत बंदची हाक
सकाळपासून संपूर्ण भिगवण शहर बंद
