Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC

Ladki Bahin Yojana eKYC: महत्त्वाची माहिती! लाडक्या बहिणींसाठी eKYC साठी मुदत वाढवली, वाचा स्टेप-बाय-स्टेप

Women Empowerment: चुकीच्या पर्यायांमुळे प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्तीची संधी. स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. e-KYC प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांना आता पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर घोषणा करत सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील. e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक लाभार्थ्यांना तक्रारी कराव्या लागल्या होत्या, विशेषतः ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केली तरीही योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी मदत ठरेल.

महिला व बालविकास विभागाने सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही निर्णय घेतला आहे. ज्या महिलांच्या e-KYC मध्ये चूक झाली आहे, त्यांनी मुदतीआधी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. ही सुविधा केवळ त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले आहेत. ऑनलाइन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया सोपी केली जाईल.

दुरुस्तीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे 'ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत' असा पर्याय निवडा. त्यानंतर पुन्हा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, यावेळी योग्य माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा. चुकीची उत्तरे दिल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात, म्हणून काळजीपूर्वक प्रक्रिया करा. या निर्णयामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला असून, योजनेचा लाभ सर्वत्र पोहोचेल.

Summary
  1. लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली.

  2. चुकीच्या पर्यायांमुळे प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी.

  3. स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.

  4. योग्य माहिती भरून प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनेचा लाभ मिळेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com