Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत ४५०० रुपये कोणाला मिळणार? वाचा नवीन अपडेटची A To Z माहिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेची चर्चा कायम आहे. दरमहा महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होत असले तरी योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांना लाभ मिळाला नाही, तर ई-केवायसी करूनही काहींना पैसे मिळाले नाहीत. यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली असता, महिला बालकल्याण विभागाने घरी जाऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांची अंगणवाडी कर्मचारी पडताळणी करणार आहेत. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना महिन्याचा हप्ता मिळणे सुरू होईल. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या तीन महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे तब्बल ४५०० रुपये थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
यामुळे अडचणीत सापडलेल्या लाडक्या बहिणींना लवकर दिलासा मिळेल. या आधी मंत्री हसन मुश्रीफ यांनी योजनेवर मोठं भाष्य केलं आहे. "तिजोरीच्या आमच्याकडे होत्या. अजितदादा गेल्यानंतर अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे गेलं.
अधिवेशनानंतर खाते आमच्याकडे येईल. त्यामुळे २१०० रुपये दिल्याशिवाय राहणार नाही," असं मुश्रीफ म्हणाले. ही योजना महिलांच्या कल्याणासाठी महत्त्वाची असली तरी अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याची गरज आहे. पडताळणीनंतर लाखो महिलांना थेट लाभ मिळेल, आणि योजनेचा वेग वाढेल असा विश्वास आहे.
• लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित ४५०० रुपये मिळणार
• ई-केवायसी न झालेल्या महिलांसाठी पडताळणी सुरू
• अंगणवाडी कर्मचारी लाभार्थी पडताळणी करतील
• पडताळणी नंतर पात्र महिलांना थेट बँक खात्यात लाभ मिळेल
