Vikas Gogawale
Vikas Gogawale

Vikas Gogawale : महाड राडा प्रकरण; विकास गोगावले पोलिसांना शरण

मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले पोलिसांना शरण आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Vikas Gogawale ) महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना मतदान केंद्रबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला होता.

या प्रकरणात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल असून त्यात विकास गोगावलेंचा समावेश आहे. विकास गोगावले तेव्हापासून फरार असून 'पोलिसांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण या' असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावले यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अखेर मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले पोलिसांना शरण आला आहे. विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण आला आहे.

Summary

  • महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्याचं प्रकरण

  • मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांना शरण

  • विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com