Beed : बीडच्या परळी येथे पशुधन एक्सपोचे आयोजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Beed ) बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. बीडच्या परळी येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने महा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी व पशुपालनासाठी देशभरातील उपयुक्त तज्ञांचे मार्गदर्शन, पशुधनाची संवर्धन वाढीसाठी चर्चासत्र, शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले 300 हून अधिक स्टॉल्स देखील या कार्यक्रमात असणार आहेत.
काल या उपक्रमाचे उद्घाटन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summary
बीडच्या परळी येथे पशुधन एक्सपोचे आयोजन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता
शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
