Beed : बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार समारोप
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Beed ) बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय राष्ट्रीय महापशुधन एक्सपोचा समारोप 15 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बीडच्या परळी येथे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी व पशुपालनासाठी देशभरातील उपयुक्त तज्ञांचे मार्गदर्शन, पशुधनाची संवर्धन वाढीसाठी चर्चासत्र, शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले 300 हून अधिक स्टॉल्स देखील या कार्यक्रमात असणार आहेत.
Summary
बीडच्या परळीत महापशुधन एक्सपोचे आयोजन
13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान महापशुधन एक्सपो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार समारोप
