Mumbai : राज्यातील आमदारांचा लंडन अभ्यास दौरा, जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतीसाठी दौरा

London Study Tour: महाराष्ट्राचे ११ आमदार लंडन अभ्यास दौऱ्यावर रवाना. शहरी नियोजन, आधुनिक प्रशासन आणि पर्यावरणपूरक विकास मॉडेल्सचा अभ्यास करून ते राज्य धोरण आणि विकास प्रक्रियेत सुधारणा करणार.
Published by :
Dhanshree Shintre

राज्याच्या विकासाच्या नव्या संधी आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळातील ११ आमदार काल लंडन येथे रवाना झाले. या दौऱ्यात आमदार योगेश टिळेकर, मनीषाताई कायंदे, शपरिणय फुके, अमित गोरखे, सुमित वानखेडे, स्नेहाताई दुबे, नमिता मुंदडा, विक्रम काळे, विक्रांत पाटील, वरुण सरदेसाई आणि बाबासाहेब देशमुख यांचा समावेश आहे.

या अभ्यास दौऱ्यात लंडनमधील आधुनिक पायाभूत सुविधा, शहरी नियोजन, कार्यक्षम प्रशासन प्रणाली तसेच पर्यावरणपूरक विकास मॉडेल्सचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. विविध पक्षांचे आमदार एकत्र येऊन जगातील सर्वोत्तम अनुभव आत्मसात करणार असून, ते महाराष्ट्राच्या धोरणनिर्मिती आणि विकास प्रक्रियेत प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प आहे.

या दौऱ्यामुळे राज्यातील शहरी विकासाला जागतिक स्तराची दिशा मिळेल आणि नागरिककेंद्रित प्रशासन सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com