Mahashivratri 2026 Celebrations
MAHASHIVRATRI 2026: MASSIVE DEVOTEE GATHERING AT JYOTIRLINGAS AND TEMPLES ACROSS MAHARASHTRA

Mahashivratri 2026: राज्यात महाशिवरात्रीचा थाटात जल्लोष; ज्योतिर्लिंगांची मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी

Maharashtra Temples: राज्यात महाशिवरात्रीचा थाटात उत्सव; बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व मंदिरांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी, दिव्य रोषणाई, फुलांची सजावट, मध्यरात्रीपासून रांगा, शासकीय महापूजा आणि ऐतिहासिक मंदिरांमध्ये भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा अनुभव.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत आज महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली असून अनेक भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त सर्वच मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले आहे.

बारा ज्योतिर्लिंग

बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला असून परळी येथील प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा दागदागिन्यांनी मढवलेल्या रूपात पार पडली. आज सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात देशभरातून आलेल्या भक्तांनी आकर्षक रोषणाईखाली दर्शन घेतले आहे.

भीमाशंकर मंदिर यंदा बंद

भीमाशंकर मंदिर यंदा विकासकामांमुळे बंद ठेवण्यात आले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली असून श्रावण महिन्यापर्यंत कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मंदिराच्या बंदीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी स्थानिक मंदिरांत गर्दी केली असून पिंपळे सौदागरमधील पेशवेकालीन मंदिरात विशेष गर्दी उसळली आहे.

मुंबई आणि उपनगरांत शिवभक्तांचा उत्साह दिसून येत आहे. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून २ ते ३ किलोमीटर लांब रांगा लागल्या असून प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय आणि पोलिस बंदोबस्त केला आहे. अंबरनाथच्या ९६६ वर्ष जुन्या मंदिरात बनारसवरून आलेल्या भक्तांना गाभाऱ्याबाहेरून दर्शन दिले जात आहे.

Summary
  • बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व मंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सव; भक्तांची अवघड गर्दी.

  • वेरूळ, परळी, त्र्यंबकेश्वर यासह प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि महापूजा.

  • मुंबई-उपनगरांतील ऐतिहासिक बाबुलनाथ, अंबरनाथ मंदिरांमध्ये भक्तांची लांब रांगा.

  • भीमाशंकर मंदिर विकासकामांमुळे बंद, भक्तांनी स्थानिक मंदिरांत दर्शन घेतले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com