Malegaon Dongrale Crime
Malegaon Dongrale Crime

Malegaon Dongrale Crime : मालेगाव प्रकरण; आरोपीला आज पुन्हा मालेगाव कोर्टात करणार हजर, कोर्ट काय निर्णय देणार, याकडे लक्ष

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Malegaon Dongrale Crime) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली. तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. खेळण्यासाठी बाहेर गेलेली चिमुकली खूपवेळ घरी आलीच नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला.

काही तासांनंतर घराच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री उशिरा गावकऱ्यांना मोबाईल टॉवरशेजारी तिचा मृतदेह आढळला. चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसांनी तत्काळ तपास सुरू करून विजय संजय खैरनार या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीची आज कोठडी संपणार असून पुन्हा मालेगाव कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मालेगाव न्यायालयात पोलीस छावणीचे स्वरूप आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आल्याने आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल की प्रत्यक्षात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summery

मालेगाव चिमुकली अत्याचार प्रकरण

आज आरोपीला मालेगाव न्यायालयात करणार हजर

आज आरोपीची पोलीस कोठडी संपेल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com