महाराष्ट्र
मोक्कातून जामीनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराचा ‘दुग्धाभिषेक’
मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबाराच्या प्रकरणात मोक्कातून सुटका झाल्यानंतर आरोपी जयदीप तावरे याचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माळेगाव येथे 31 मे रोजी रविराज तावरे यांच्या गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

