Khopoli Mangesh Kalokhe
Khopoli Mangesh Kalokhe

Khopoli Mangesh Kalokhe : खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरण; 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी, 2 आरोपींना पोलीस कोठडी

रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निघृण हत्या करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Khopoli Mangesh Kalokhe ) रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निघृण हत्या करण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या.

मंगेश काळोखे यांच्या निघृण हत्येनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात ही हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

आता 12 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी खालापूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर नव्याने अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Summary

  • रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण

  • हत्येतील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

  • अटकेतील 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com