Palghar : माकपच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Palghar) पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडू लाँग मार्च काढण्यात आला आहे. आज या माकपच्या लाँग मार्चचा दुसरा दिवस असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा लाँग मार्च धडकणार आहे.
आज सकाळी दहा वाजता हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करणार तर संध्याकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, जलजीवन मिशन ची कामे त्वरित पूर्ण करावी.
पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले वाळवण बंदर दर व मुरबे येथील जिंदाल बंदर रद्द करावे यासारख्या विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
Summary
पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च
विविध मागण्यांसाठी लाँग मार्चचं आयोजन
मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करणार
