Borivali West Fire
BORIVALI WEST MUMBAI BUILDING METER BOX FIRE CONTROLLED BY FIRE BRIGADE

Borivali West Fire: मुंबईच्या बोरीवलीत इमारतीच्या लाइट मीटर बॉक्सला आग

Mumbai Fire: मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथे सरदार आकांक्षा इमारतीतील लाइट मीटर बॉक्सला आग लागली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयासमोर असलेल्या सरदार आकांक्षा इमारतीतील लाइट मीटर बॉक्सला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मीटर बॉक्सला आग लागल्याने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला.

घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ फायर सेफ्टी किटच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवताना मीटर बॉक्समधून फटाक्यांसारखे आवाज येत होते, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीच्या कारणांची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

Summary
  • बोरीवली पश्चिम, सरदार आकांक्षा इमारतीतील लाइट मीटर बॉक्सला आग लागली.

  • शॉर्ट सर्किटमुळे मीटर बॉक्स जळून खाक झाला आणि वीजपुरवठा खंडित झाला.

  • रहिवाशांनी फायर सेफ्टी किटने आग विझवण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दलाने २० मिनिटांत आग नियंत्रणात आणली.

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, आगीच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com