सीएसएमटी स्थानकात ‘मील ऑन व्हील’ रेस्टॉरंट सुरु

सीएसएमटी स्थानकात ‘मील ऑन व्हील’ रेस्टॉरंट सुरु

Published by :
Published on

सीएसएमटी स्थानकात ' रेस्टॉरंट ऑन व्हील'ची उभारणी करण्यात आली आहे. जुन्या आणि सेवेतून बाद झालेल्या रेल्वे डब्याचा वापर रेस्टॉरंटसाठी करण्यात येणार असून प्रवाशांना रेल्वे परिसरातच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे.

नॉन फेर रेव्हन्यू अंतर्गत भारतीय रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील'ची योजना सुचविली आहे. ज्या ठिकाणी ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने येतात, त्याठिकाणी रेस्टारंट उघडावे, असे रेल्वे मंडळाकडून सूचना केल्या आहेत. यासह सर्व विभागांना जुने झालेल्या डब्यांमध्ये रेस्टारंट उभे करण्यासाठी जागेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मध्य रेल्वेने मुंबई विभागातील सीएसएमटी येथे त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

सीएसएमटीच्या 18 नंबर फलाटाबाहेर पी.डीमेलो रोडच्या दिशेने उभारण्यात येणाऱ्या या रेस्टॅारंटमध्ये 50 जणांची बसण्याची क्षमता असेल. यासाठी कंत्राटदारास 28 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मध्य प्रदेश रेल्वे टूरिझम काॅर्पोरेशनेही रेल कोच रेस्टॅारंट सुविधा सुरू केली आहे. जुन्या आणि सेवेतून बाद झालेल्या रेल्वे डब्याचा वापर रेस्टॉरंटसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे परिसरातच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध होईल. तर, रेल्वेला यातून उत्पन्नांचे साधन तयार होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com