Vikas Gogawale : महाड राडा प्रकरणी मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला जामीन मंजूर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Vikas Gogawale ) महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना मतदान केंद्रबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला होता.
या प्रकरणात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल असून त्यात विकास गोगावलेंचा समावेश आहे. विकास गोगावले तेव्हापासून फरार असून 'पोलिसांना शरण या' असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावले यांना दिले होते. त्यानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आला.
याच पार्श्वभूमीवर आता मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला जामीन मंजूर झाला असून विकास गोगावले याच्यासह शिवसेनेच्या आठ अटक आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपींकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.
Summary
महाड नगर पालिका निवडणूक राडा प्रकरण
मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या आठ अटक आरोपींना जामीन मंजूर
न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपींकडून जामिनासाठी अर्ज
