Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद; कोणते मोठे खुलासे करणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून अजित पवार यांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून केला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता गुप्तहेर संस्थेकडून मिळालेला डाटा आज आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत मांडणार असल्याची माहिती मिळत असून याच गुप्तहेराच्या मदतीने रोहित पवार आजच्या पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता रोहित पवार आजच्या पत्रकार परिषदेमधून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
अजितदादांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून केला जाणार
आज रोहित पवार यांची पत्रकार परिषद
