“माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत”; आ. शशिकांत शिंदेंचा टोला

“माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत”; आ. शशिकांत शिंदेंचा टोला

Published by :
Published on

माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला आहे. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरुन शशिकांत शिंदे यांनी खोचक वक्तव्य केलं आहे.

"मी निवडुन आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लागावलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com