Beed
Beed

Beed : वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात कैद्याकडे सापडला मोबाईल

बीड जिल्हा कारागृहात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Published on

(Beed) बीड जिल्हा कारागृहात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी वाल्मिक कराड असलेल्या तुरुंगात आता एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याकडे चक्क मोबाईल सापडला असल्याची माहिती मिळत आहे.

कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका कैद्याचे कारागृहातील वर्तन संशयास्पद वाटल्याने कारागृह प्रशासनाने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे मोबाईल आढळून आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी कैद्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com