Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नव्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

चंद्रपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pratibha Dhanorkar) चंद्रपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. यातच आता काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्हॉटसअपच्या स्टेटस ठेवलं आहे.

त्यांच्या या व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून पती बाळू धानोरकर यांचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला आहे. पती बाळू धानोरकर यांचा व्हॉट्सॲप स्टेटसला फोटो ठेवत "मिस यु बॉस" असे लिहिले आहे.

यासोबतच बाळू धानोरकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बाळू धानोरकर असे म्हणत आहेत की, 'संकट त्याच्याच वाटेला येतात ज्याची पेलायची ताकद असते. येड्या गबाल्याच्या वाटेला संकट येतच नाही. संकट येताच म्हणजे संपवायला नाही, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करायला.' असे स्टेटस धानोरकर यांनी ठेवले आहे.

Summary

  • प्रतिभा धानोरकर यांच्या व्हॉटसअपच्या नव्या स्टेटसची चर्चा

  • पती बाळू धानोरकर यांचा फोटो व्हाट्सअप स्टेटसवर

  • "मिस यु बॉस" म्हणत राजकीय वादात पतीची केली आठवण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com