Mumbai BMC: मुंबई महापालिकेची आज विशेष सभा, स्थायी व सुधार समितीवर २६ सदस्यांची होणार निवड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा आज होत असून, यात विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेत्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तसेच स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावेही जाहीर होणार आहेत.
भाजप हा BMC निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्याने पक्षाचे गटनेते गणेश खणकर हे सभागृह नेते म्हणून घोषित होणार आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट) हा दुसऱ्या क्रमांकावरील मोठा विरोधी पक्ष असल्याने गटनेत्या किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेत्या म्हणून मान्यता मिळणार आहे. महापौर रितू तावडे यांनी दोन्ही पक्षांकडून प्राप्त पत्रानुसार ही घोषणा करणार आहेत.
या विशेष सभेनंतर समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर २० फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक होईल. यासाठी १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या घोषणांमुळे BMC च्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मुंबई BMC विशेष सभा आज, समित्यांसाठी २६ सदस्यांची निवड
BJP गटनेते गणेश खणकर सभागृह नेते घोषित
शिवसेना (ठाकरे गट) किशोरी पेडणेकर विरोधी पक्ष नेते
स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपद निवड २० फेब्रुवारीला
