Mumbai Melody Road
MUMBAI COASTAL ROAD INAUGURATED AS INDIA’S FIRST MELODY ROAD BY CM DEVENDRA FADNAVIS

Mumbai Melody Road: भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai Coastal Road: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या रस्त्यावर वाहन चालवताना स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याचा अनुभव मिळणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईतील वाहतुकीला गती देणाऱ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला (सागरी किनारा मार्ग) आज नवी ओळख मिळाली. हा मार्ग आता देशातील सर्वप्रथम मेलडी रोड (संगीतमय रस्ता) म्हणून प्रसिद्ध होणार आहे. अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रस्त्यावरून वाहन चालवताना 'जय हो' या स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून आपोआप ऐकायला मिळणार आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प राबवला असून, बुधवारी दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेलडी रोडचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह बोगद्यातून बाहेर पडल्यावर अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यानच्या पहिल्या मार्गिकेतील सुमारे ७०० मीटर लांबीच्या रस्त्यावर हे संगीतमय तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे.

वाहनांच्या टायरांच्या दाबाने रस्त्यावरील खास खड्डे आणि उभारण्या सक्रिय होतात, ज्यामुळे 'जय हो' ची धून आपोआप वाजते. हे तंत्रज्ञान हंगरीमधील तज्ज्ञांनी विकसित केले असून, मुंबईकरांसाठी एक अनोखा प्रवासाचा अनुभव देणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईला आधुनिक आणि पर्यटनप्रिय शहर बनवण्यासाठी असे नवकल्पनात्मक प्रकल्प महत्त्वाचे आहेत. कोस्टल रोड आता केवळ वाहतूक मार्गच नव्हे, तर संगीताचा आनंद देणारा रस्ता होईल."

Summary
  • मुंबईतील कोस्टल रोडवर देशातील पहिला संगीतमय रस्ता सुरु

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

  • ‘जय हो’ गाण्याची धून वाहन चालवताना ऐकता येईल

  • हंगेरियन तंत्रज्ञानाने तयार केलेला ७०० मीटरचा मेलडी रोड

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com