Maharashtra Municipal Election
Maharashtra Municipal Election

Maharashtra Municipal Election : महानगरपालिका निवडणूक; कुठे, किती टक्के मतदान?

महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Maharashtra Municipal Election) महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.

आज मतमोजणी पार पडणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कुठे, किती टक्के मतदान?

मुंबई- ५२.९४%,

ठाणे - 55.59%

उल्हासनगर - 52.10%,

भिवंडी निझामपूर - 38.21%

पनवेल - 44.04%,

नाशिक -56.67%

अहिल्यानगर - 48.49%

सोलापूर - 40.39%,

कोल्हापूर - 66.54%

कल्याण डोंबिवली - 52.11%,

नवी मुंबई- 45.51%

मिरा भाईंदर - 38.34%,

वसई विरार - 45.75%

धुळे -36.49%

पुणे - 52.42%,

पिंपरी चिंचवड - 40.50%

सांगली मिरज-कुपवाड- 61.3%,

छत्रपती संभाजीनगर- 43.67%

नांदेड वाघाळा - 42.47%

नागपूर- 51%

चंद्रपूर- 56.89%

परभणी- 49.16%

इचलकरंजी- 69.76 %

अमरावती- 53.65%

जालना- 45.94%

अकोला- 43.35%

जळगाव-53.59 %

लातूर-60 %

मालेगाव : 64.8%

Summary

  • महानगरपालिकांसाठी मतदान काल मतदान पार पडलं

  • आज मतमोजणी पार पडणार

  • राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com