Nagpur BJP
Nagpur BJP

Nagpur BJP : नागपूर भाजपा नगरसेवकांची गटनोंदणी 27 जानेवारीला?

महापालिका निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nagpur BJP) महापालिका निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता नागपूर महापालिकेतील भाजपच्या 102 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी उद्या 27 जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे सभागृहातील महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार यासाठी एक मताने निर्णय घेणार असून महापौर, सत्तापक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष व परिवहन सभापती ही महत्त्वाची पदे असणार आहेत. महापौरपद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • नागपूर भाजपा नगरसेवकांची गटनोंदणी 27 जानेवारीला?

  • भाजपच्या 102 नगरसेवकांची होणार स्वतंत्र गटनोंदणी

  • महापौरपद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com