Nashik Metro: नाशिकमध्ये नियमित मेट्रोचा नवा प्रस्ताव; टायरबेस निओ मेट्रोला ब्रेक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
देशातील पहिली आणि किफायतशीर बेस्ड टायर मेट्रोवर केंद्रशासनाने अव्यवहार्य ठरवून फुली मारल्यानंतर आता नियमित मेट्रोसाठी मात्र महामेट्रो तयार झाली आहे. या नियमित मेट्रोसाठी त्यांनी सर्वेक्षण केले असून पुढील आठवड्यात नाशिक महापालिकेने बैठक बोलवण्याची सूचना मेट्रोने केली आहे.
नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये नाशिकला निओ मेट्रोची घोषणा केली होती. राज्यशासनाने महामेट्रोचा प्रस्ताव लक्षात घेऊन २०१९ मध्ये विधान सभा निवडणुकांआधी निओ मेट्रोला मान्यता देऊन तसा शासन निर्णय देखील जारी केला होतो, तर केंद्र शासनाने त्यासाठी २०२१ मध्ये एकूण २१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
मात्र, नंतर २०२४ पर्यंत ही मेट्रो पूर्ण करण्याचे नियोजन कुचकामी ठरले आणि पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने पुन्हा सार्वजनिक वाहतुकीसाठी भक्कम साधन म्रपान निभो मेट्रो आणि नियमित मेट्रोची चाचपणी करण्याचे ठरले होते. मात्र, केंद्रशासनाने निओ मेट्रोच्या प्रस्तावावर फुली मारली आहे. त्यामुळे मेट्रोचा एक पर्याय संपल्यात जमा झाला. दरम्यान, महामेट्रोने नाशिक शहरात वाहतुकीचा पुन्हा एकदा अभ्यास केला असून एकात्मिक वाहतूक विकास आराखडा तयार केला आहे.
केंद्राने टायरबेस निओ मेट्रो प्रस्ताव रद्द केला
महामेट्रोकडून नियमित मेट्रोचा नवा प्रस्ताव
२०१८ मध्ये निओ मेट्रोची घोषणा, २१०० कोटी निधी मंजूर
नाशिकसाठी एकात्मिक वाहतूक विकास आराखडा तयार
