Nashik Tapovan : नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरण: पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik Tapovan ) नाशिकच्या तपोवन येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारताना होणाऱ्या सुमारे 1800 झाडांच्या कथित वृक्षतोडीविरोधात काल सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी पार पडली.
मनसे नेते नितीन पंडित यांनी वृक्ष तोडण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती.
याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात 24 तारखेला ही सुनावणी पार पडणार असून काल झालेल्या सुनावणीत मनपा प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने ही सुनावणी पुढे ढकलली गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार
मुंबई उच्च न्यायालयात 24 तारखेला होणार सुनावणी
मनसे नेते नितीन पंडित यांनी वृक्ष तोडण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
