एनसीबीनं माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात फसवलं – नवाब मलिक

एनसीबीनं माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात फसवलं – नवाब मलिक

Published by :
Published on

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली आहे. मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला. एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात.

गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. 27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com